शोषणमुक्त समाजाची मांदियाळी निर्माण व्हावी ; राज्यअध्यक्ष डॉ.विजय लाड

 सामाजिक चातुर्मासाचे सहावे पुष्प उत्साहात संपन्न ! 

 


   उदगीर.....             / प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहक बंधू-भगिनी साठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे सामाजिक चातुर्मासाचे आयोजन म्हणजेच चार महिने चालणाऱ्या या कार्यक्रमात दर रविवारी ऑनलाइन, यु-ट्यूब, फेसबुक लाईव्ह द्वारे प्रसारित करण्यात येते. त्यात दर वेळेस नवीन वक्ता, नवीन विषय, यासह ग्राहक सेवा कायदे आदी विषय असतात. हया कार्यक्रमात पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोकण व नागपूर सह अमरावती विभाग सहभागी होतात. याच्या निमित्ताने चातुर्मास कार्यक्रमात ग्राहक हक्क व संघटना विषयावर उपयुक्त माहिती मिळते व दिली जाते, सामाजिक स्वास्थ्यबद्दल सुरेख माहिती दिली जाते, समाज शरण वृत्तीची जोपासना आयुर्वेदाने कशी दृढमूल केलेली आहे. हे ऐकून अभिमान वाढतोय, तज्ञ व्यक्ती व्दारे, वक्ताव्दारे तथा डॉक्टर कडून विविध ग्राहक संदर्भातील सखोल माहिती दिली जात आहे. " वमन प्रक्रिया"  संघटनात्मक सुदृढतेसाठी ग्राहक कार्यकर्त्यांना कधीतरी वापरावी लागणारी प्रक्रिया याबाबत माहिती दिली जाते. ओघवत्या, शब्द प्रवाही भाषेत आयुर्वेदाचे ज्ञान या चातुर्मासातून दिले जाते ते कार्येकर्त्यांना मिळते तसेच आयुर्वेदा विषय अतिशय अनमोल माहिती दिली गेली. तसेच उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र अनिल गिरनारे यांनी वास्तवाची मर्यादा आणि आत्मपरीक्षण करून देणारी माहिती ग्राहक व कार्यकर्त्यांना दिली. पेट्रोलियम आणि इलेक्ट्रॉनिक काट्यांमध्ये व्हेरिएशन असू शकते का?  या बाबतीत ही माहिती दिली. पेट्रोल पंपाची तपासणी कार्यकर्त्यांसह नेहमी होणे गरजेचे, कायदे सक्षम नाहीत होणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगितले. वजन माप विषय उत्तम अभ्यासपूर्ण व सखोल असे मार्गदर्शन केले. सुरेख, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजनासाठी औरंगाबाद विभागाचे कौतुक महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.

ग्राहकतीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशीजी म्हणजेच ऊर्फ नानानी ग्राहक प्रबोधनासाठी अनेक उपक्रम आपल्याला म्हणजेच कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्या उपक्रमांपैकी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे "  सामाजिक चातुर्मास " या चातुर्मासाच्या निमित्ताने सर्वसामान्य लोक विशेषता गृहणीचे प्रबोधन करणे हाच चातुर्मासाचा हेतु आहे. पण हा नियम चार महिन्यासाठी नाही तर अखंड चालणारे व्रत आहे.

या चातुर्मासाच्या कार्यक्रमात बंधू-भगिनी त्यांना वृतधारी म्हणतो. सुरुवातीस या वृतधारी यांना एक कापडी पिशवी, व लक्ष्मीनारायणाचा फोटो दिला जायचा व चातुर्मासाचे व्रत म्हणून रोज एक मूठभर धान्य त्या पिशवीत टाकायचे आणि शेवटी ते सर्व धान्य एकत्र करून ते अनाथ आश्रमांस दान करायचे. म्हणजेच सत्पात्री दान असे, अशी माहिती औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष सतीश माने यांनी यावेळी सांगितली.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून वातावरण वेगळे आहे. आपणाला म्हणजेच ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी ऊर्फ नाना च्या.ग्राहक जनजागृती कार्यकर्त्यांना एकत्र येणे शक्य नाही. त्यामुळे या वर्षी राज्य कार्यकारणीने विज्ञानाच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ऑनलाईन सामाजिक चातुर्मास २०२१ ही योजना मांडली आणि राज्याच्या पाच विभागाने तात्काळ होकार दर्शवला. त्यानंतर २१ जुलैला या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माहिती व जनसंपर्क संचालक गणेश रामदासी यांच्या हस्ते झाले. आणि पहिला कार्यक्रम पुणे विभागाने घेतला. आणि आता औरंगाबाद विभागाचे पहिले पुष्प मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी पहिल्या व दुसऱ्या पुष्पात योग्य व मोलाचे असे मार्गदर्शन केले. आणि चातुर्मासाचे सहावी पुष्प आज मान्यवराच्या हस्ते गुंफले गेले. सगळेच कार्यक्रम छान संपन्न होत आहेत. हा कार्यक्रम दर रविवारी ऑनलाइन, यूट्यूब, फेसबुक लाईव्ह द्वारे सर्वसामान्यांपर्यंत व ग्राहकापर्यंत प्रसारित करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी नवीन वक्ता, नवीन विषय, सामान्यज्ञान, समाविषयक करण्यात येत आहे. असा हा चातुर्मास संपन्न होत आहे. असेच कार्यक्रम ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे भविष्यातही एकत्रितपणे घेणार आहोत. असे विभागीय अध्यक्ष सतीश माने यांनी सांगितले.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्यअध्यक्ष डॉ.विजय लाड म्हणाले की, शोषणमुक्त समाजाची मांदियाळी निर्माण व्हावी ही भावना व्यक्त करित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यामागे आहे. याकामी राज्य कार्यकारणीचे सदस्य सचिव अरुण वाघमारे, सर्जराव जाधव, राज्य कार्यकारणीचे प्रमोद कुलकर्णी, डी.एस.कुलकर्णी, मेधा कुलकर्णी हे विशेष मेहनत घेतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याचे अध्यक्ष डॉ. विजय लाड, सचिव अरुण वाघमारे, सर्जराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कुलकर्णी, देविदास कुलकर्णी, सौ. मेधा कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष सतीश माने, संघटक हेमंत वडणे,  प्रल्हाद तिवारी, ग्राहक जनजागृती कार्यकर्ता बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सुशील कुलकर्णी, प्रा. वैभव कुलकर्णी, अॕड. नारायण सोमवंशी, शरद सूर्यवंशी, खरे, अश्विनी कुलकर्णी, शरद वडगावकर, रवी पिसे सह आदीजण विशेष परिक्षेम घेत आहेत.

Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत