पीक नुकसानीचे सूचनापत्र घेण्यास विमा कंपनी प्रतिनिधीचा नकार ! *शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा*

 .



जळकोट     ......   प्रतिनिधी 

जळकोट तालुक्यातील अतनूरसह परिसरातील खरीप हंगामातील पावसाच्या उघडीपीने नुकसान झालेल्या नुकसानीचा सूचना फार्म घेण्यास विमा कंपनीच्या प्रतिनिधीने नकार देऊन आपले अर्ज ऑनलाइन करा, असे सांगितले. ऑनलाइन चालतच नाही. त्यामुळे चार दिवसात अर्ज स्वीकारले तर ठिक अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

अतनूर परिसरातील मुग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, हायब्रीड ज्वारी इत्यादी पिकांचे मागील पावसांच्या उघडीपीने जागेवर वाळुन जाऊन नुकसान झाले आहे. बरीच शेती चक्क जाळयाल्यासारखी काळी दिसत आहे. विमा कंपनीस सूचना फार्म देण्यास अतनुर येथील प्रसिद्ध विधी तज्ञ अॕड. बी.एम.सासट्टे अतनूरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ जळकोट तालुका विमा प्रतिनिधी बारवाड यांच्याकडे गेले असता प्रत्यक्षात अर्ज घेण्यास नकार दिला. आपण वीमा कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन क्रॉप इन्शुरन्स अॕपवर नुकसान फोटो, व्हिडिओ, फार्म भरण्यास सांगितले. परंतु, उपरोक्त अॕपवर ऑनलाईन माहिती, नुकसान अर्ज अपलोड होत नाही व नुकसानी सूचना फार्म विमा प्रतिनिधी बारवाड घेण्यास तयार नाहीत.याबाबतीत घोणसी व अतनूर मंडळातील सर्व शेतकर्‍यांच्या वतीने ॲड.सासट्टे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पुढील तीन-चार दिवसात जर विमा कंपनीने अर्ज घेतले नाही. तर शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. असा इशारा ॲड. बी.एम.सासट्टे, भाजपा नेते पाटील, शिवसेनेचे विकास सोमुसे, युवा सेनेचे मुक्तेश्वर येवरे, ज्ञानेश्वर जाधव, शिवराज रेड्डी, तानाजी सोमुसे, विजय चव्हाण, शेतकरी बी.जी.शिंदे, चौव्हाण, माधव बाबर, गोपाळ कोडगिरे, बाबू  पंचगल्ले, ईश्वर अतनूरकर, शहाजी पाटील, जे.जी. शिंदे, माधवसिंह चव्हाण, उपसरपंच बाबू कापसे, अनिल पत्तेवार गव्हाणकर, जावेद मुंजेवार यांनी दिला आहे.