समर्पण करीअर इन्स्टिट्यूटचे एमएच-सीईटी 2021 मध्ये घवघवीत यश..!*

 .








उदगीर, 

            येथील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, आत्मविश्वास व अथक परिश्रमाचे बीज पेरणाऱ्या समर्पण करियर इन्स्टिट्यूटने अल्पावधीतच घवघवीत यश प्राप्त केले असून शंभर टक्के निकालासह तालुक्यातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये या समर्पणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

        एमएच- सीइटी मधील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तीनही विषयांमध्ये समर्पण च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. बायोलॉजी विषयात मलिशे लक्ष्मी गोविंद या विद्यार्थिनीने 98.14 पर्सेंटाइल मिळवीत समर्पण मधून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. बायोलॉजीमध्ये स्वाती घंटे 97.14%, कृष्णा लोणे 96.64%, अंजली जाधव 96.30% तर समीक्षा पत्तेवार 95.59% पर्सेंटाइल  मिळवित उत्तुंग यश मिळविले आहे. केमिस्ट्री विषयात मलिशे लक्ष्मी गोविंद 97.50%,  शुभम संजय काळे 93.98%,  अंजली तानाजी जाधव 93.85%, कृष्णा गोविंद लोणे 93.49% तर अस्मिता अनुराथ कुंटे 91.13% पर्सेंटाइल मिळविले आहे. फिजिक्स मध्ये जाधव अमित किशनराव 97.39%, तुकाराम राजकुमार साळुंके 93.22% तर अदित्य संभाजी भालेमारे 92.59% पर्सेंटाइल मिळवित या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. .

      समर्पण चे संचालक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार व डॉ. एपीजे अब्दुल कलाम युथ आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त प्रा. अविनाश प्रभूराव पाटील, संचालक प्रा. सुनिल यशवंतराव ढगे, व्यवस्थापकीय संचालक विकास प्रभुराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तर या यशासाठी प्रा. अक्षय मुंगळे, प्रा. दिपक बिरादार , प्रा. अशोक कदम, प्रा. ओमकार शिंदे, प्रा. गणेश कदम, प्रा. राधाकिशन जाधव, प्रा. कृष्णा जायभाये आदींनी परिश्रम घेतले आहे. समर्पण च्या या यशाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.