स्वामी विवेकानंदचे विद्यार्थ्यी विद्यापीठात प्रथम

 .





उदगीर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कायम राखला आहे.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्यावतीने घेण्यात आलेल्या एप्रिल २०२१ च्या अंतीम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून  महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या व माध्यमशास्त्र या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाचा  विद्यार्थी राहुल केशवराव बालुरे हा विद्यापीठातून प्रथम,नागसेन नामदेवराव तारे तृतीय, ग्रंथालय व माहितीशास्त्र या अभ्याक्रमाचा विद्यार्थी राहुल मारोतीराव चव्हाण   प्रथम तर वृत्तपत्रविद्या व माध्यमशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी धनराज गंगाधर पाटील हा प्रथम आला आहे.      

  यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुधीर जगताप, शैक्षणिक संचालक संजय हट्टे, उपप्राचार्य डाॅ.भिमाशंकर कोडगे, वृत्तपत्रविद्या व माध्यमशास्त्र विभागप्रमुख प्रा.शाहूराज किंवडे, प्रा.कैलास कांबळे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमर तांदळे, उषा गायकवाड, शकुंतला सोनकांबळे, अमोल भाटकुळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.