जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.सिद्राम शेटकार सन्मानीत !

 .


उदगीर ......: मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने उदगीर येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आसनारे  व मागील बावीस वर्षापासुन शेटकार क्लासेसच्या मध्यमातुन आनेक् गुणवंत विद्यार्थी घडविनारे 

शेटकार केमेस्ट्री क्लासचे संचालक

प्रा.सिद्राम शिवराज शेटकार यांना जिल्हास्तरीय 

आदर्श शिक्षक  पुरस्कार देऊन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते रविवारी सन्मानीत करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विवेक सुकने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रोहन जाधव, रा.काँचे जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील तोंडचिरकर, उद्योजक बिपीन पाटील, प्रा. गोविंद शेळके, मारोती जाधव, स्वागताध्यक्ष मादलापूर चे सरपंच उदय मुंडकर, जकनाळचे सरपंच रामेश्वर बिरादार, ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक ताहेर हुसेन, नवनाथ गायकवाड, समीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रा.सिद्राम शेटकार हे मागच्या वीस वर्षांपासून शैक्षणिक ,धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.