प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात पत्रकार संजय शिंदे सपत्नीक यांचा सत्कार

 .


अतनूर / प्रतिनिधी 

येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार नुकताच राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयात वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्र.कु. महानंदा दीदी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रह्मकुमारी मीरा बहन, संगीता बहन, ज्ञानसागर भाई, नितीन भाई, विठ्ठल भाई, औदुंबर भाई उपस्थित होते. योगा शिक्षिका म्हणून आदरणीय महानंदा दीदी विश्वविद्यालय यांचे नियमित विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.