दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मातृभूमीचा मदतीचा हात

 सतिश उस्तुरे यांच्या मदतीमुळे दृष्टीहीन अमोलच्या जीवनात प्रकाशाचा किरण!



 उदगीर.....

उदगीर येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणारे  क्लेस्टॉप डिवाइस  खरेदी करण्यासाठी  दृष्टिहीन अमोल  महाके या विद्यार्थ्यासाठी मदतीचा हात दिला .

 उदगीर येथील बापूसाहेब  एकंबेकर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणारा  अमोल  महाके याचे  दहावीत  असताना दृष्टी गेली त्यामुळे  शिक्षणात अडचणी निर्माण होत होत्या यासंदर्भात  सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे  यांना माहिती मिळताच अमोल  यांच्या शिक्षणातील अडचण दूर व्हावी यासाठी  दृष्टीहिन  विद्यार्थ्यांसाठी  अभ्यासासाठी  उपयुक्त   असलेले क्लेस्टाॅप डिवाईस    हे सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी मदत केली त्यामुळे अमोल  महाके यांचे शिक्षण पूर्ण होणार आहे. सतीश  उस्तुरे  यांच्या दातृत्वामुळे विद्यार्थ्याला मदत होऊन दृष्टिहीन असलेल्या अमोल  महाके याच्या जीवनात प्रकाशाचा किरण येणार आहे .

यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान  शिक्षण  प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी ,,सतीश पाटील, संतोष कुलकर्णी ,प्रा. बिभीषण मद्देवाड प्रा उस्ताद सय्यद प्रा  रंजीत मोरे नंदकुमार बयास यांची उपस्थिती होती