समस्त नागलगावकर ग्रामस्थांनी रक्तदान करून केली साजरी दिवाळी

 .



नागलगाव.........

नागलगाव येथील तरुणांनी पुढाकार घेऊन अनोखी दिवाळी साजरी केली. दिवाळी हा सण एकमेकांना भेट देऊन साजरा करण्याचा उत्सव

अंधारकडून प्रकाशाकडे प्रवास करणारा उत्सव

सत्याचा असत्यावर केलेला विजय म्हणजे दिवाळी

पण दुःख आणि अडचणीत असणाऱ्या रुग्णांना मदतीचा हात पुढे करत या आदर्श नागलगावकरांनी रक्तदान करून एक आदर्श दिवाळी साजरी केली.सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी पुढे येत हा आनंदोत्सव साजरा केला.तब्बल ३४ रक्तदात्यांनी हे महादान आज केले.

या शिबिराची सुरुवात या गावाची अभियंता  कुमारी किरण बिरादार हिने आपल्या आयुष्यातील पहिले रक्तदान  केले.या सर्व आनंदोत्सवाची तयारी नागलगांवातील सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बिरादार,बसवराज शेरे,केदार पाटील,नितीन सूनेवाड,ज्ञानेश्वर तेलंग,महेश तोंडारे,अनिकेत बाळे,प्रशांत कनकट्टे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली.या आदर्श रक्तदान शिबिराचे विशेष कौतुक अंबरखाने ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने यांनी केले व सर्व रक्तदात्यांचे आभार ब्लड बँकेचे डॉ.बस्वराज शेटकार यांनी मानले.