सहपरिवार रक्तदानाने दिवाळी साजरी

 .


उदगीर.......

उदगीर येथील तांदळे परिवाराने सहपरिवार रक्तदान करून एक वेगळा संदेश उदगीर वासीयांना दिला.

दिवाळी हा सण कुटुंबीय एकत्र येऊन एकमेकांना प्रेम व भेट देऊन साजरा केला जातो,पण उदगीर येथे रक्तदान या महादानाने हा सण संदीप प्रेमकुमार तांदळे,सुनीता संदीप तांदळे ,सिद्धांत सुहास तांदळे,सुनीता गोजे यांनी साजरे केले.

सध्या संबंध राज्यात रक्ताचा तुटवडा असून असंख्य जिह्यात प्रशासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे,उदगीर येथील बुंद परिवाराने उदगीर च्या नागरिकांना आपले वाढदिवस करण्याचे आवाहन केले व त्यांच्या या आवाहनास उदगीर वासीयांनी भरपूर प्रेम दिले आणि बघता बघता या आवाहनाला साद देत असंख्य रक्तदाते पुढे येतानाचे चित्र आज दिसून येत आहे.

या अभुतपूर्व कुटुंबीय रक्तदान केल्याबद्दल तांदळे परिवाराचे आभार नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेच्या वतीने डॉ बस्वराज शेटकार यांनी मानले.

बुंद परिवाराच्या वतीने आपला व आपल्या मित्रांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्याचे आवाहन ओम गांजुरे यांनी केले व सोबतच या अलीकडच्या काळात आपल्या घरातील व आजूबाजूची बरीच मंडळी कोविड च्या विळख्यात आपल्या पासून हिरावून गेली आणि आपण त्यांच्या आठवणी स्मरण दिवस म्हणून रक्तदान करत अनेक अडचणीत असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देऊन ही श्रद्धांजली देऊया.

हा स्मरण दिवस रक्तदान करून श्रद्धांजली देण्याचं भावनिक आवाहन बुंद परिवाराच्या वतीने करण्यात आले.