*धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा*

 .





उदगीर(प्रतिनिधी):-येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये *सहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिन-पंधरवाड्याचा* शुभारंभ *आयुर्वेदा फॉर पोषण* या संकल्पनेनुसार धन्वंतरी पुजन व स्तवनाने करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार;यु.डी.ए.चे अध्यक्ष डॉ.गोविंद सोनकांबळे;आय.एम.ए.उदगीरचे अध्यक्ष डाॅ.बाळासाहेब पाटील;निमा,उदगीरचे अध्यक्ष डॉ.राजकुमार घोनसीकर;हिम्प,उदगीरचे अध्यक्ष डाॅ.चंद्रकांत कोठारे;डाॅ.संजय कुलकर्णी,डाॅ.सुनील बनशेळकीकर,डाॅ.धनाजी कुमठेकर,उदगीर डाॅक्टर्स वुमेन्स फोरमच्या उपाध्यक्ष डाॅ.सुप्रिया पाटील,सचिव डाॅ.प्राजक्ता गुरुडे व कोषाध्यक्ष डाॅ.कांचन मोरे,डाॅ.उषा काळे,डाॅ.डी.ए.भोसले,डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार आदि उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ.अविनाश जाधव यांनी निरोगी जीवन व रोग नियंत्रणात समप्रमाणात घेतलेल्या पोषण आहाराचे महत्त्व सांगितले.


प्रमुख अतिथी डाॅ.दत्तात्रय पवार म्हणाले की विविध कारणांमुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण जात आहे.फास्ट फुड,मद्यपान, मसालेदार किंवा तिखट पदार्थांचे अत्याधिक प्रमाणात सेवन हे आजाराला निमंत्रण देते व  आजार अंगावर काढून वेळेत उपचार न घेतल्यामुळे आजार बळावण्याची व व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन आहार-विहार केला पाहिजे.


अध्यक्षीय समारोपात डाॅ.दत्तात्रय पाटील म्हणाले की आयुर्वेद चिकित्सा शास्त्रामध्ये *अन्नाला ‘महाभैषज्य’म्हणजेच ‘उत्तम औषध’* असे मानले आहे.अन्नामध्ये मूलत: निसर्गाच्या पाच मूलभूत घटकांचा समावेश होतो.पंचमहाभूते म्हणजे आकाश,वायु,अग्नि,जल आणि पृथ्वी या घटकांचे अन्न योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील त्या समान घटक सुद्धा साम्यावस्थेत राहतात.शरीर आणि मनासाठी उपयोगी आहार-विहार सवयींना पथ्य तर हानिकारक किंवा रोग निर्माण करणारा आहार-विहार सवयींना अपथ्य म्हणुन संबोधला जातो.आपण जो आहार सेवन करतो त्या प्रमाणेच आपल्या शारीरिक व मानसिक प्रकृतीत त्या-त्या कालावधीत बदल निर्माण होतात.भोजनाची वेळ तथा योग्य व संतुलित पोषक आहार आणि निरोगी दैनंदिन सवयी रोगांच्या उपचारात किंवा प्रतिबंधात मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतात.अन्यथा अनेक कुपोषणजन्य समस्या निर्माण होतात.


याप्रसंगी डाॅ.गोवींद सोनकांबळे,डाॅ.बाळासाहेब पाटील,डाॅ.राजकुमार घोनसीकर,डाॅ.धनाजी कुमठेकर,डाॅ.चंद्रकांत कोठारे,डाॅ.प्राजक्ता गुरुडे व डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार यांची समयोचित भाषणे झाली.


*याप्रसंगी नागरिकांना स्वस्थवृत्त विभागाच्या माध्यमातून त्रिदोष प्रकृतीनुरूप आहारीय पदार्थांची सचित्र माहिती देण्यात आली आणि तसेच द्रव्यगुण विभागाच्या माध्यमातून वनौषधींचे मोफत वाटप तथा रसशास्त्र विभागाच्या माध्यमातून रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आयुष काढ्याचे निशुल्क वितरण करण्यात आले.*


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैभव बिरादार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सचिन टाले यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ.राजेंद्र धाटे,डाॅ.एस.आर.श्रीगिरे,डाॅ.आनंद अष्टुरे,डाॅ.प्रतिभा केंद्रे,डाॅ.अरुणा मालशेटवार,डाॅ.यशोधन सताळकर,डाॅ.रश्मी चिद्रे,डाॅ.सुप्रिया वायगावकर,डाॅ.दीपिका भद्रे,डाॅ.गुरुराज वरनाळे, डाॅ.अस्मिता भद्रे,डाॅ.शोयब सुहेल,डाॅ.सुषमा कोंगे आदिंचे सहकार्य लाभले.


याप्रसंगी धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,सामान्य रुग्णालय व उदगीर डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तथा वैद्यकीय अधिकारी,कार्यालयीन व रुग्णालयीन कर्मचारी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.