सात्विक आहार व जीवनशैली हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली-प्रविण मेंगशेट्टी*

.



 उदगीर(प्रतिनिधी):-उदगीर डॉक्टर्स असोसिएशन व वुमेन्स फोरम तथा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *दीपोत्सव-2021 उत्सव दिव्यांचा. . .अंतरीच्या-दिवाळी आहार* या कार्यक्रम प्रसंगी बोलताना उद्घाटक उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी उपरोक्त उद्गार काढले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रामेश्वर गोरे,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार;यु.डी.ए.चे अध्यक्ष डॉ.गोविंद सोनकांबळे;आय.एम.ए.उदगीरचे अध्यक्ष डाॅ.बाळासाहेब पाटील;तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे,निमा,उदगीरचे अध्यक्ष डॉ.राजकुमार घोनसीकर,हिम्प उदगीरचे अध्यक्ष डाॅ.चंद्रकांत कोठारे,उदगीर डाॅक्टर्स वुमेन्स फोरमच्या अध्यक्ष डाॅ.ज्योती मध्वरे,डाॅ.शैलेष येरोळकर,डाॅ.प्राजक्ता गुरुडे,डाॅ.प्रविण देशमुख,डाॅ.अलिरजा कौसर आदि उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.डॉ.अस्मिता भद्रे यांनी दीपावली सणासोबतच भारतीय संस्कृतीत वर्णन केलेल्या विविध सणांचे शरीर व मन यांच्या स्वास्थ्यरक्षण व रोग नाश यामधील महत्त्व सांगितले.


याप्रसंगी डाॅ.गोविंद सोनकांबळे दीपावली सणाचे अध्यात्मिक महत्व विशद करताना म्हणाले की,भारतीय उपखंडातील विविध जाती-धर्माचे लोक दीपावली हा सण आपापल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.


प्रमुख अतिथी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सामाजिक सौहार्दामध्ये दीपावली सणाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करून जागतिक कोरोना महामारी पासून मुक्ती मिळो अशी सद्भावना व्यक्त केली व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.


उद्घाटनपर भाषणात दीपावलीच्या शुभेच्छा देऊन उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी पुढे म्हणाले की,एकंदरीतच कोवीड संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या कालावधीत व मिशन कवच कुंडल या कोविड लसीकरण अभियानामध्ये सामाजिक जाणीव व तळमळ या भुमिकेतुन उदगीर डॉक्टर्स असोसिएशन व धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने शासकीय यंत्रणा व समाजाला महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय सहकार्य लाभले असुन भविष्यातही मानव कल्याणकारी अशा कोवीड लसीकरणासाठी वैद्यकीय व्यवसायिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करतील असा आशावाद व्यक्त केला.


अध्यक्षीय समारोपात *आयुर्वेदा फॉर पोषण* या विषयावर बोलताना डाॅ.दत्तात्रय पाटील म्हणाले की,ऋतूनुसार व तसेच दोन ऋतूंच्यामधील ऋतुसंधीच्या कालावधीत आयुर्वेद चिकित्सा शास्त्रामध्ये नमूद केलेला सर्व रसात्मक,गुणात्मक व पांचभौतिक आहार-विहार समप्रमाणात योग्य पद्धतीने घेतला तर वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम होणार नाहीत व आरोग्य टिकून राहील.भविष्यातही आरोग्य,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा,ईत्यादी उपक्रमांसाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य राहील असे नमूद केले.


कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत सूत्रसंचालन डॉ.कालिदास बिरादार यांनी  तर आभार डॉ.प्रशांत कापसे यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ.सुनील बनशेळकीकर,आय.डी.ए.उपाध्यक्ष डाॅ.संजीव बिरादार,डाॅ.सुप्रिया पाटील,डाॅ.एस.आर.श्रीगिरे,डाॅ.उषा काळे,डाॅ.कांचन मोरे,डाॅ.संगमेश्वर दाचावार,डाॅ.उदय गुजलवार,डॉ.किशोर बुबणे,डाॅ.संजय कुलकर्णी,डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार,डाॅ.रश्मी चिद्रे,डाॅ.संजय चाकुरकर,डाॅ.सुहेब शेख आदिंचे सहकार्य लाभले.


याप्रसंगी उदगीर डॉक्टर्स असोसिएशन व वुमेन्स फोरम तथा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज व सामान्य रुग्णालय,उदगीर चे पदाधिकारी व सदस्य तथा वैद्यकीय अधिकारी,रुग्णालयीन कर्मचारी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.