मॕक्स हॉस्पिटल उदगीरकरांचा विश्वास संपादन करेल- माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

.


 उदगीर /प्रतिनिधी,



उदगीर शहारात अनेक खाजगी दवाखने असले तरी डॉ. आयुब पठाण एमडी बरोबरच डीएनबी पोटाच्या विकाराचे तज्ञ असल्यामुळे त्यांचा उदगीरकरांना मोठा फायदा होणार आहे. त्यांची सेवा नक्कीच उदगीरकरांच्या विश्वास पात्र ठरेल असा विश्वास मँक्स हॉस्पीटल व आयसीयु सेंटरच्या उदघाटनप्रसंगी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यपणन मंडळाचे अध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बस्वराज पाटील नागराळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य कल्याण पाटील, पंसचे सभापती शिवाजी मुळे, मार्केट कमीटीचे साभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, नगरसेवक ताहेर हूशेन डॉ. दत्रय पवार, डॉ. बाळासाहेब पाटील, आदिंची प्रमुख उपस्थी होती.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले डाॕ. आयुब पठाण हे उच्च शिक्षीत डाॕक्टर असून मोठ्या शहरात त्यांना मोठी प्रसिध्दीसह चांगला मोबदलाही मिळाला आसता. पुणे- मुंबई सारख्या शहरातही पोटाविकार तज्ञाची वेळ लवकर मिळत नाही. डॉ. पठाण हे आपल्या जन्मभुमीतील लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. ते पोटविकार तज्ञ आसल्यामुळे त्याचा फायदा उदगीर सह परीसरातील लोकांना होणार आहे. त्याबद्दल डॉ. पठाण व त्यांच्या सर्व सहकार्यांना मनपुर्वक शुभेच्छा. 

यावेळी ना. संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे सह सर्व मान्यवरांनी डाॕ. पठाण यांच्या मॕक्स हाॕस्पीटलला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन शिवसेट्टे तर आभार प्रभुदास गायकवाड यांनी मानले. यावेळी उदगीर शहार व परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.